भाजपच्या विजयावर राहुल गांधींचं ट्विट, मोदींचा रिप्लाय

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या या विजयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Mar 11, 2017, 05:56 PM IST
भाजपच्या विजयावर राहुल गांधींचं ट्विट, मोदींचा रिप्लाय title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या या विजयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या भाजपच्या विजयाबद्दल मी मोदी आणि भाजपचं अभिनंदन करतो, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. राहुल गांधींच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रिप्लाय दिला आहे. धन्यवाद, लोकशाही जिंदाबाद असं मोदी म्हणाले आहेत.