राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधूनच सवाल

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Updated: Mar 11, 2017, 08:46 PM IST
राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधूनच सवाल  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. परिवर्तनासाठी राहुल गांधींनी आता ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला असला तरी पंजाबमध्ये मात्र काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. तर गोवा आणि मणिपूरमध्येही काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला ११७ पैकी ७७ जागा मिळाल्या आहेत. गोव्यामध्ये ४० पैकी १७ तर मणिपूरमध्ये ६० पैकी २६ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे.