राहुल गांधी झाले काँग्रेसचे उपाध्यक्ष

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर आता पक्षात नवी जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी पक्षाचे नवे उपाध्यक्ष असतील.

Updated: Jan 19, 2013, 11:34 PM IST

www.24taas.com, जयपूर
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर आता पक्षात नवी जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी पक्षाचे नवे उपाध्यक्ष असतील.
काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते ए. के. अँण्टोनी यांनी हा प्रस्ताव ठेवला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह सर्व सदस्यांनी प्रस्तावाला मान्यता दिली. राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात आता क्रमांक दोनचं स्थान मिळालं आहे. जयपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे तीन दिवसीय चिंतन शिबिर सुरु असून, रविवारी शिबिराचा समारोप होत आहे. दरम्यान, आज दिवसभरापासूनच राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या.
अखेर जयपूरमध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास काँग्रेस कार्यसमितीची बैठक संपली. बैठकीत संरक्षणमंत्री ए. के. एंटनी यांनी राहुल गांधी यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनविण्यात यावे असा प्रस्ताव मांडला. त्याला पक्षातील नेत्यांनी एकमताने मंजुरी दिली.