नवी दिल्ली : नेपाळला हादरवून सोडणाऱ्या भूकंपानंतर राहुल गांधी शुक्रवारी दिल्ली स्थित नेपाळी दूतावासात दाखल झाले.
भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली देताना राहुल गांधी यांनी व्हिजिटर्स बूकमध्ये शोक संदेशही लिहिला. परंतु, यावेळी राहुल गांधींना लिहिण्यासाठी शब्दच सुचेनात... शेवटी 'हाय टेक' राहुल गांधींनी आपल्या डोक्याचा वापर न करता आपल्या मोबाईलचा वापर करण्याचा निर्णय घेतला.... आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईल फोनमधून पाहत पाहत आपला संदेश वहीवर नोंदवला.
आपल्या संदेशात राहुल गांधींनी भूकंपात मारल्या गेलेल्या लोकांविषयी संवेदना व्यक्त केली. भारतीय नेपाळच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, असा दिलासाही देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 'गेल्या काही दिवसांत जगानं भयंकर घटना पाहिल्यात. काही जखमा कधीच भरल्या जाऊ शकणार नाहीत'
पण, मोबाईलवर पाहून शोक संदेश लिहिणाऱ्या राहुल गांधीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांची चांगलीच टर उडवली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.