हरवलेले राहुल गांधी लवकरच सापडणार!

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कुठे आहेत? असा प्रश्न देशातील जनतेला काही दिवसांपासून पडला होता. मात्र आता लवकरच राहुल गांधी जनतेसमोर येणार आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी दिल्लीत १९ एप्रिलला होणाऱ्या कॉंग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सहभाग घेणार आहेत. 

Updated: Mar 31, 2015, 02:44 PM IST
हरवलेले राहुल गांधी लवकरच सापडणार!  title=

दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कुठे आहेत? असा प्रश्न देशातील जनतेला काही दिवसांपासून पडला होता. मात्र आता लवकरच राहुल गांधी जनतेसमोर येणार आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी दिल्लीत १९ एप्रिलला होणाऱ्या कॉंग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सहभाग घेणार आहेत. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मोदी सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयकाविरूद्ध रामलीला मैदानात सोनिया गांधी, राहुल गांधीसह कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते या रॅलीत उपस्थित राहणार आहेत. या रॅलीत दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानचे अनेक शेतकरीही सहभागी होणार आहेत.  

राहुल गांधी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब आहेत... यावरून राहुल गांधी हरवले असल्याची काही पोस्टर्ससुद्ध उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांत दिसले होते.

मात्र, आता राहुल गांधी चांगल्या महिन्याभराच्या सुट्टीनंतर पुन्हा देशाच्या राजकाणात सक्रिय होण्यास तयार झाले आहेत. किसान रॅलीनंतर राहुल गांधीची पक्षातील भूमिकाही स्पष्ट होऊ शकते, अशी चर्चाही सर्वत्र होत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.