नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने तत्काल आरक्षणाच्या वेळेत बदल केला आहे, तसेच तत्काल बुकिंग ठरवून दिलेल्या वेळेत, रद्द केले तर ५० टक्के परतावा मिळणार आहे.
तत्कालच्या बदललेल्या नव्या नियमानुसार एसी डब्यासाठीचं बुकिंग सकाळी १० ते ११ या एका तासात करता येणार आहे, तर नॉनएसी डब्यासाठीचं बुकिंग सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत करता येणार आहे.
या बाबतीत रेल्वे बोर्ड पुढील आठ ते दहा दिवसात सूचना जारी करणार आहे. एक जुलैपासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे, याबाबतीत रेल्वे लवकरच घोषणा करणार आहे.
तसेच प्रमियम तसेच तत्काल तिकिट रद्द केल्यावर प्रवाशांना ५० टक्के परतावा मिळणार आहे. यासाठी रेल्वेने तयारी सुरू केली आहे. आहे. सकाळी १० ते १२ दरम्यान तत्काल रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी एजंटना बंदी आहे.
सध्या तत्काल तिकीट रद्द झाल्यास कोणताही परतावा मिळत नाही. रेल्वेकडून आणखी दुसऱ्या पर्यायावर विचार सुरू आहे, कन्फर्म तत्काल तिकिटावर किती परतावा द्यावा, यावर हा विचार सुरू
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.