पवनकुमार बन्सल यांच्यापाठोपाठ अश्विनीकुमारांचाही राजीनामा

रेल्वेतील लाचखोरी प्रकरण पवनकुमार बन्सल यांना चांगलंच भोवलंय. पंतप्रधानांची भेट घेऊन बन्सल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा सादर केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 10, 2013, 10:07 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
रेल्वेतील लाचखोरी प्रकरण पवनकुमार बन्सल यांना चांगलंच भोवलंय. पंतप्रधानांची भेट घेऊन बन्सल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा सादर केलाय. बन्सल यांच्यानंतर कायदेमंत्री अश्विनीकुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केलाय.
भाच्यानं केलेली रेल्वे लाचखोरी प्रकरणात रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल पुरते अडकलेत. त्याचमुळे त्यांनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सादर केलाय. शुक्रवारी याअगोदर मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चर्चा झाली होती. यामध्येच बन्सल यांनी राजीनामा द्यावा असा निर्णय पक्का झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
सकाळी ऑफिसमध्ये न दिसलेले बन्सल संध्याकाळी मात्र तातडीनं रेल्वे मंत्रालयात दाखल झाले होते. पत्नीनं नजर काढल्यानंतर बन्सल घराबाहेर पडले होते. पण, शेवटी त्यांना राजीनामा द्यावाच लागला.

पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्याकडे लागलं होतं. बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर अश्विनीकुमार यांनीही राजीनामा दिलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.