रेल्वेची प्रवाशांना खुशखबर

रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे.

Updated: Apr 29, 2016, 06:50 PM IST
रेल्वेची प्रवाशांना खुशखबर  title=

नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे. आता फक्त एक कॉल करून प्रवाशांना त्यांचं तिकीट कॅन्सल करता येणार आहे. आता सुरु असलेल्या इनक्वायरी नंबर 139 वर कॉल केल्यानंतर प्रवाशांना तिकीट कॅन्सल करता येणार आहे. 

ही सुविधा 10 मेपासून सुरु होणार आहे. तिकीट कॅन्सल केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्हाला स्टेशनवर जाऊन तुमचे तिकीटाचे पैसे परत घ्यावे लागणार आहेत.