पुणे : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, त्यावर कोणताही वाद किंवा चर्चा करण्याची गरज नसल्याचं भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी म्हटलं आहे. काश्मिरचा केवळ भूभागच नाही, तर संपूर्ण काश्मिरी जनता ही आमची आहे. तिथल्या लोकांना सर्व अधिकार आहेत, फक्त ते संविधानाच्या चौकटीत असावेत असंही राम माधव म्हणाले.
हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर बुरहान वानीचं काश्मीरमध्ये एन्काऊंटर करण्यात आलं. यानंतर काश्मीरचं वातावरण तापलं. काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.
पुण्यात एका कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या पत्रकारांना माधव यांच्याहस्ते नारद पुरस्कारानं गौरविण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.