राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी

अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 22, 2017, 02:10 PM IST
राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी  title=

नवी दिल्ली : अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे. त्यामुळे उभय पक्षांत हा न्यायालयाबाहेर निघण्याची  शक्यता जास्त बळावली आहे.

आम्ही राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी तयार आहोत, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना रशीद फिरंगी यांनी म्हटले आहे. धर्म आणि भावना याविषयी चर्चेतून योग्य निर्णय घेता येतो. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र बसून याविषयी चर्चा करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने काल दोन्ही पक्षांना दिला होता. त्यानंतर आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिरबाबत मध्यस्थी करण्याची भूमिका मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर या राम मंदिर वादाविषयी न्यायालयाबाहेर चर्चा करून त्यावर निराकरण करण्यास आम्ही तयार असल्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना रशीद फिरंगी यांनी स्पष्ट केलेय.