राम मंदिर निर्माणाचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही : साक्षी महाराज

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्याचे समर्थन केले आहे. राम मंदिराच्या प्रश्नावर बोलताना साक्षी महाराज म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा मार्ग अडवू शकत नाही.

Updated: Jun 4, 2015, 06:04 PM IST
राम मंदिर निर्माणाचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही :  साक्षी महाराज

नवी दिल्ली : भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्याचे समर्थन केले आहे. राम मंदिराच्या प्रश्नावर बोलताना साक्षी महाराज म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा मार्ग अडवू शकत नाही.

अयोध्येतील राममंदिर बांधण्यासाठी मोदी सरकारला कायदा करण्यासाठी विधेयक आणावे लागेल. आम्ही बेरजेचे राजकारण करत नाही. राममंदिर बांधण्यासाठी कोणाचीही गरज नाही आहे. राममंदिराचे निर्माण कोणीही रोखू शकत नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे भाजपचे राज्यसभेतील खासदार विनय कटियार यांनी बुधवारी याच मुद्द्याचे समर्थन केले होते. 1990 च्या दशकातील राममंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा राहिलेले कटियार म्हणाले होते, की मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता हा मुद्दा सोडविण्यासाठी पुढे जाणे गरजेचे आहे. भाजपने दिलेले राममंदिर निर्माणाचे वचन कायदा करून किंवा चर्चा करून सोडविणे गरजेचे आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.