शिक्षिकेने केली सातवीतल्या मुलाची हत्या

आपल्या मुलीवर प्रेम करतो म्हणून एका शिक्षिकेने सातव्या इयत्तेत शिकणा-या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रांचीमध्ये घडली आहे. 

Updated: Feb 10, 2016, 05:09 PM IST
शिक्षिकेने केली सातवीतल्या मुलाची हत्या title=

रांची : आपल्या मुलीवर प्रेम करतो म्हणून एका शिक्षिकेने सातव्या इयत्तेत शिकणा-या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रांचीमध्ये घडली आहे. 

नेझाम खातून असे या शिक्षिकेचे नाव आहे. नेझाम रांचीच्या सॅपफीरे इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका आहे.

 
विनय महतो या ११ वर्षाच्या मुलाला नेझाम यांच्या मुलीबद्दल आकर्षण वाटत होते. ते नेझाम यांना अजिबात आवडत नव्हते. म्हणून त्यांनी विनयची हत्या केली. शिक्षक क्वाटर्सबाहेर विनय मृतावस्थेत आढळला होता. नेझाम पती आणि दोन मुलांसह या शिक्षक क्वाटर्समध्ये रहातात. पोलिसांनी नेझाम आणि त्यांच्या पतीला अटक केली आहे. 

न्यायवैद्यक आणि अन्य पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी नेझाम आणि त्यांच्या पतीला अटक केली. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास मुलगा त्याच्या वसतिगृहाच्या खोलीतून बाहेर येऊन मुलगी रहात असलेल्या क्वाटर्सच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता. 

त्यानंतर काही मिनिटांनी रात्री दीडच्या सुमारास शिक्षक वसतिगृहाच्या मुख्य प्रवेशव्दारावर हा मुलगा मृतावस्थेत एका शिक्षकाला आढळला.