Cholesterol Foods : स्वयंपाक घरातील 'हे' 3 पदार्थ Bad Cholesterol घटविण्यास फायदेशीर, रक्तात असलेले LDL फिल्टर करण्यास करेल मदत

कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे गरजेचे असून तुमच्या किचनमधील काही पदार्थ यासाठी फायदेशीर ठरतील.

नेहा चौधरी | Updated: Jun 26, 2024, 11:35 AM IST
Cholesterol Foods : स्वयंपाक घरातील 'हे' 3 पदार्थ Bad Cholesterol घटविण्यास फायदेशीर, रक्तात असलेले LDL फिल्टर करण्यास करेल मदत  title=
These 3 kitchen items are beneficial in reducing Bad Cholesterol filter LDL in the blood

Cholesterol Foods : खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा तर वाढतोच आणि त्यासोबत वाढतोय खराब कोलेस्ट्रॉल. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असून खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल म्हणजे कमी घनता असलेले लिपोप्रोटीन. हे खराब कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होतं आणि ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक सारख्या आरोग्य समस्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायामासोबत आहारात काही पदार्थांचा बदल तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल असं आहार तज्ज्ञ सांगतात. वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (These 3 kitchen items are beneficial in reducing Bad Cholesterol filter LDL in the blood)

हे घरगुती उपाय खराब कोलेस्ट्रॉल करेल नियंत्रित 

लसणाचे सेवन: लसणाचे सेवन हृदयाला निरोगी ठेवण्यासोबतच रक्तदाबही सामान्य ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे दररोज लसणाच्या 3-4 पाकळ्या खाव्यात. 

अक्रोडाचे सेवन : अक्रोड खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल हळूहळू वितळण्यास मदत मिळते. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राहण्यासही फायदा मिळतो. 

ओट्सचे सेवन : ओट्सच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. शिवाय ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते, जे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरतं. याशिवाय त्यात ग्लुकन नावाचा घटक आढळतो जो आतडे स्वच्छ करण्यास मदत करतं. 

हेसुद्धा वाचा - कोलेस्ट्रॉलची चाचणी कोणत्या वयात करावी?

कोलेस्ट्रॉलची चाचणी करा!

या घरगुती उपायांसोबतच तुम्ही रक्त तपासणीद्वारे तुमचे कोलेस्ट्रॉल तपासून घ्यायला हवं. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही रक्त तपासणी करु शकता. हे तुमचे LDL आणि HDL कोलेस्टेरॉलचे स्तर तपासते. हे तुमच्या शरीरातील फॅट ट्रायग्लिसराइड्सचे देखील मोजमाप करते. उच्च ट्रायग्लिसराइड पातळी हृदयाशी संबंधित रोगांचा धोका वाढवतात. तुम्हाला हृदयविकार किंवा मधुमेह असल्यास किंवा तुमच्या कुटुंबात उच्च कोलेस्टेरॉलचा इतिहास असल्यास, तुम्हाला ही चाचणी लवकर करून घेणे गरजेचे असते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)