नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता देशाला संबोधित करत पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आणि देशभरात सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेर रांगा लागू लागल्या तर एटीएममधून पैसे काढण्याठीही मोठ मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. एक महिन्यानंतर नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. कोणी या निर्णयाचं स्वाहत केलं तर कोणी टीका.
नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात नव्या नोटा छापण्याचं काम सुरु झालं. तब्बल 9.2 लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा व्यवहारात आणल्या गेल्या. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी ही माहिती. संसदेच्या स्थायी समितीसमोर नोटाबंदीच्या निर्णयावर उत्तर देतांना त्यांनी ही माहिती दिली. 20 जानेवारी रोजी ते पुन्हा संसदेच्या लोक लेखा समितीसमोर हजर राहणार आहेत. या लोक लेखा समितीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सदस्य असणार आहेत. तर या समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली आहेत. जानेवारी 2016 मध्येच नोटाबंदीची प्रक्रिया सुरु झाली असल्याचं उर्जित पटेल यांनी म्हटलं आहे.