राम मंदिर उभारणीचे कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावे - संघाची मागणी

अयोद्धेत श्रीरामाचं मंदिर व्हावं अशी संपूर्ण हिंदू समाजाची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीत असलेले कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय. हैदराबादमध्ये काल संघाच्या प्रतिनिधी सभेचा समारोप झाला. त्यावेळी पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भैय्याजी जोशींनी ही मागणी सरकारकडे केली आहे.

Updated: Oct 26, 2016, 09:08 AM IST
राम मंदिर उभारणीचे कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावे - संघाची मागणी title=

हैदराबाद : अयोद्धेत श्रीरामाचं मंदिर व्हावं अशी संपूर्ण हिंदू समाजाची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीत असलेले कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय. हैदराबादमध्ये काल संघाच्या प्रतिनिधी सभेचा समारोप झाला. त्यावेळी पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भैय्याजी जोशींनी ही मागणी सरकारकडे केली आहे.

गेल्या तीन दशकांपासून राम मंदिराचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर निर्णय घेणं आता गरजेचं आहे. शिवाय अहलाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्या वादग्रस्त जमिनीवर राममंदिराशिवाय इतर कुठलही बांधकाम होणं अशक्य आहे. अहलाबाद हायकोर्टच्या खंडपीठानं वादग्रस्त जागेचे तीन हिस्से करून हिंदू आणि मुस्लिम याचिकाकर्त्यांमध्ये वाटण्याचा निर्णय दिला आहे. सध्या वादग्रस्त जागेवर रामललाचं तात्पुरंतं मंदिर आहे, ती जागा हिंदू याचिकाकर्त्यांच्या हिस्सात देण्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय. त्यावर मुस्लिम याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. तिथे याबाबतची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.