हैदराबाद : रोहित वेमुलाच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमूला याने आत्महत्या केली होती, त्यानंतर दोषींना शिक्षा देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या त्याच्या आईला छातीत दुःखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. या प्रकरणामध्ये कमालीचा निष्काळजीपणा दाखविणाऱ्या कुलगुरूंना अटक केली जावी, अशी मागणी रोहितच्या आईने केलेली आहे.
रोहितच्या आई राधिका यांना छातीत दुःखू लागल्याने खासगी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. रोहितचा भाऊ राजा हा त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशभर आंदोलन आणि संतापाची लाट उसळली असताना रविवारी विद्यापीठाचे कुलगुरू आप्पाराव पोडिले यांनी बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.