अबब! मोदींच्या 'त्या' सूटला तब्बल १.२१ कोटींची बोली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित सूटसाठी १.२१ कोटी रुपयांची बोली सूरतमध्ये लागली आहे. बराक ओबामांसोबतच्या कार्यक्रमात मोदींनी नरेंद्र दामोदरदास मोदी असं अॅम्ब्रॉयडरी केलेला सूट घातला होता. 

Updated: Feb 18, 2015, 04:24 PM IST
अबब! मोदींच्या 'त्या' सूटला तब्बल १.२१ कोटींची बोली title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित सूटसाठी १.२१ कोटी रुपयांची बोली सूरतमध्ये लागली आहे. बराक ओबामांसोबतच्या कार्यक्रमात मोदींनी नरेंद्र दामोदरदास मोदी असं अॅम्ब्रॉयडरी केलेला सूट घातला होता. 

स्वत:च्या नावासाठी मोदी किती दुराग्रही आहेत अशी त्यांच्यावर टीकाही झाली होती. तसंच या सूटसाठी त्यांनी ५ ते १० लाख रुपये उधळल्याच्या बातम्याही झळकल्या होत्या. मात्र, हा सूट त्यांना एका चाहत्यानं भेट दिल्याचं समोर आलंय. तसंच या सूटच्या लिलावातून उभी राहणारी रक्कम ते गंगेच्या शुद्धीकरणाच्या कार्यात खर्च करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

लिलावामध्ये सुरेश अग्रवाल या व्यावसायिकानं हा सूट एक कोटी रुपयांना विकत घेण्याची बोली लावली. त्यानंतर विरल चोक्सी या अनिवासी भारतीयानं १.११ कोटी रुपयांची बोली लावली. त्यावर कडी करताना राजेश जुनेजा यांनी १.२१ कोटी रुपयांची बोली लावली आहे.

गंगा शुद्धीकरणासारख्या चांगल्या कामासाठी ही रक्कम जाणार असल्यानं आपण चढी बोली लावत असल्याचं सहभागी उद्योजकांनी सांगितलं.

मोदींना गिफ्ट म्हणून मिळाला होता लाखमोलाचा सूट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित आणि महागड्या सूटचे गुढ उकलले असून एका अनिवासी भारतीयानं मोदींना हा सूट भेट दिल्याचे समोर आले आहे. मोदी हे आमच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असल्याने त्यांना हा सूट दिल्याचे रमेशभाई विरानी यांनी सांगितले असून सूटवरुन निर्माण झालेल्या वादावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.