www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्केट व्हॅल्यू ५ रूपये आहे. ही मोदींची खरी किंमत आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रवक्ते आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे.
हैदराबाद येथे पुढील महिन्यात नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेला पाच रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. सभा तिकिटावरून मोदी यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे हे कळते, अशी बोचरी टीका तिवारी यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे प्रचारप्रमुख म्हणून मोदी यांची गोव्यात निवड करण्यात आली. मोदी यांची ११ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी पाच रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. त्यामुळे भाजपवर काँग्रेस नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.
एखादा चित्रपट पाहण्यासाठीही २०० ते ५०० रुपयांपर्यंतचे तिकीट काढावे लागते. मात्र, एका फ्लॉप वक्त्याचे भाषण ऐकण्यासाठी फक्त पाच रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. तर एखाद्या बाबाचे प्रवचन ऐकण्यासाठीही १०० ते हजार रुपयांपर्यंत तिकीट खरेदी करावे लागते. यावरून मोदींचे मार्केट व्हॅल्यू किती आहे, हे दिसते असे तिवारी म्हणालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.