संघाचा एक्झीट पोलः एनडीएला नाही संपूर्ण बहूमत

विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झीट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळणार असे दाखविले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने केलेल्या एक्झीट पोलमध्ये एनडीएला संपूर्ण बहुमत मिळणार नसल्याचे धक्कादायकरित्या समोर येत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 14, 2014, 06:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झीट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळणार असे दाखविले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने केलेल्या एक्झीट पोलमध्ये एनडीएला संपूर्ण बहुमत मिळणार नसल्याचे धक्कादायकरित्या समोर येत आहे.
एनडीए संपूर्ण बहुमतापासून काही जागा दूर राहू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रेडिफ मेल डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार संघाच्या एक्झीट पोलमध्ये सांगण्यात आले की, एनडीएला एकूण २५९ जागा मिळतील. त्यात २२६ जागा मिळणार आहेत. संघ आणि भाजपनुसार टीडीपीला ८ जागा, शिवसेनेला १० ते १२ जागा, अकाली दल ५ जागा, तामिळनाडू, यूपी, ईशान्याकडील राज्ये आणि बिहारमधील सहयोगी दलांना १० जागा मिळतील.
हा सर्वे भाजप आणि संघच्या बुथवरील कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या फिडबॅकवरून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी संघाने संपूर्ण जोर लावला होता. संघातील कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन संपर्क साधला.
सर्वेक्षणानुसार यूपीमध्ये भाजपला 45,
बिहार - 18,
गुजरात - 21,
मध्य प्रदेश - 22,
राजस्थान - 21,
कर्नाटक - 15,
हरियाणा - 6,
छत्तीसगढ़ - 9,
झारखण्ड - 9,
महाराष्ट्र - 18,
पश्चिम बंगाल - 3,
सीमांध्र और तेलंगाना - 5,
असम - 6,
दिल्ली - पांच,
तमिलनाडु - 2,
उत्तराखण्ड - 4,
जम्मू कश्मीर - 2,
ओडिशा - 3,
पंजाब - 2,
हिमाचल प्रदेश - 2,
गोवा - 2,
केन्द्र शासित प्रदेशात - 6 जागा मिळणार आहेत.
एक्झीट पोल नुसार भाजपला केरळमध्ये एकही जागा मिळणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.