संघाचा ड्रेस बदलण्याची शक्यता, हाफ चड्डी ऐवजी येईल ट्राउजर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा ड्रेसकोड बदलण्याची शक्यता आहे. तरुणांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी ड्रेस कोडमध्ये बदल करण्याची तयारी केली जातेय.

Updated: Nov 4, 2015, 03:36 PM IST
संघाचा ड्रेस बदलण्याची शक्यता, हाफ चड्डी ऐवजी येईल ट्राउजर  title=

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा ड्रेसकोड बदलण्याची शक्यता आहे. तरुणांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी ड्रेस कोडमध्ये बदल करण्याची तयारी केली जातेय.

रांचीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या संघाच्या बैठकीत ड्रेसकोडबाबत चर्चा करण्यात आली. संघ प्रचारकांच्या मते, शाखांमध्ये हाफ पॅन्ट ऐवजी ट्राउजर ठेवलं जावं. रांचीमध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर काही स्वयंसेवकांनी ट्राउजर घालून दाखवलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रेसला बदलायचा मुद्दा पुढील वर्षी मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत पण उचलला जाईल. ही सभा संघाची सर्वोच्च निर्णायक संस्था आहे. या बैठकीमध्ये नव्या ड्रेसकोडबाबत विचार केला जाईल.  

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संघाच्या ५० हजार शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेत कमीतकमी १० स्वयंसेवक आहेत. अशात ५ लाख ड्रेसची गरज पडेल. संघाच्या एका प्रचारकांनुसार संघात अशा कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे, जे दररोज शाखेत येत नाहीत. काही महत्त्वाच्या दिवशी येतात. त्यांच्यासाठी सुद्धा ड्रेसची गरज पडेल. 

यापूर्वी २०१०मध्ये संघाच्या गणवेशात बदल करण्यात आला होता. चामड्याच्या बेल्ट ऐवजी कॅनवासचा बेल्ट वापरत येतोय. हा बदल संपूर्ण देशात कार्यान्वित करण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागले. 

१९२५ ते १९३९ पर्यंत संघाचा ड्रेस पूर्णपणे खाकी होता. १९४०मध्ये पांढरा शर्ट लागू करण्यात आला. १९७३मध्ये चामड्याच्या बुटांऐवजी लॉगबूट आलेत. नंतर रेक्सीनच्या बुटांचाही पर्याय देण्यात आला. सूत्रांनुसार ड्रेस कोडमध्ये बदल करण्याचा काही जुन्या प्रचारकांनी विरोध केलाय. तर दुसरीकडे संघाच्या काही नेत्यांचं काळानुसार बदललं पाहिजे, असं म्हणणं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.