आरएसएसला दहशतवादी संघटना घोषित करा : आजम खान

समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ताजमहालच्या जागी शंकराचे मंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे आझम खान यांनी सांगितलेय.

Updated: Dec 7, 2015, 11:27 AM IST
आरएसएसला दहशतवादी संघटना घोषित करा : आजम खान title=

दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ताजमहालच्या जागी शंकराचे मंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे आझम खान यांनी सांगितलेय.

तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे असंही विधान त्यांनी केलेय. रविवारी आझम खांनी यांनी पत्रकांरांशी बोलताना हे विधान केले. यावेळी त्यांनी बाबरी मशीदीबाबतही वक्तव्य केले.

सध्या दोन महत्त्वाचे प्रश्न समोर आहेत पहिला म्हणजे आरएसएसला काय हवंय आणि दुसरा प्रश्न म्हणजे देशाचे संविधान आणि कायदा काय म्हणतो, असे खान म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.