'आरक्षण देणं म्हणजे विघटनवादाला खतपाणी घालणं'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Updated: Jan 20, 2017, 08:09 PM IST
'आरक्षण देणं म्हणजे विघटनवादाला खतपाणी घालणं' title=

जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही आरक्षणाची व्यवस्था कायमस्वरुपी राहू नये, असंच मत मांडल्याचं वैद्य म्हणाले.

जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये वैद्य यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मुस्लिमांना आरक्षण दिल्यास त्यांचा सामाजिक दर्जा उंचावेल का, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर अनुसूचित जाती-जमातींचं अनेक वर्षं शोषण झाल्यामुळे त्यांना आरक्षण देण्यात आलं होतं. आरक्षणाऐवजी सर्वांना शिक्षणाच्या अधिक संधी मिळाल्या पाहिजेत. यापुढे आरक्षण देणं म्हणजे विघटनवादाला खतपाणी घातल्यासारखं असल्याचं वैद्य म्हणाले.