नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर एक गाव दत्तक घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी सचिनने ही बाब स्पष्ट केली.
मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने मोदी यांची घेतली. या भेटीत सचिनने आदर्श ग्राम योजनेंतर्गत एक गाव दत्त घेण्यासोबतच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खेळांच्या विकासासाठी काम करण्याची इच्छाही मोदींकडे व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ अभियानात सहभागी होण्यासाठी सचिन तेंडुलकरला आवाहन केले होते. पंतप्रधान यांच्या आवाहनानंतर सचिनने त्याच्या मित्रांसोबत मुंबईत रस्त्यावर उतरुन स्वच्छता केली होती. यानंतर सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी मोदींची भेट घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.