www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
सहारा उद्योगसमूहाचे मालक सुब्रतो रॉय यांनी आज शुक्रवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांनी ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रॉय यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढल्यानंतर रॉय यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी पोलिसांनी छापा मारला होता. मात्र तेथे ते सापडले नव्हेत. आपण लखनऊमध्येच असून डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो होतो, असा दावा रॉय यांनी केला. पोलिसांना त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्यासंदर्भात सांगितल्याचे रॉय यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपली आई आजारी असल्याने ३ मार्चपर्यंत आपल्या घरीच कैदेत राहु देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयास केली होती. मात्र, त्यांच्यावर न्यायालयाने अटक वॉरंट बजावले होते. यावेळी कोर्टाने त्यांना फटकारले होते. सहारा उद्योगसमूहाने आपल्या गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रुपये परत न केल्यासंदर्भात न्यायालयामध्ये सध्या प्रकरण सुरु आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.