प्रेमी युगूलाला सरपंचाकडून अशीही शिक्षा

छोटा उदयपूर जिल्ह्यातील एका गावात सरपंचाने गावातील प्रेमी युगूलाला शिक्षा देण्याचा प्रताप केला आहे. 

Updated: Apr 26, 2015, 07:51 PM IST
प्रेमी युगूलाला सरपंचाकडून अशीही शिक्षा

गुजरात : छोटा उदयपूर जिल्ह्यातील एका गावात सरपंचाने गावातील प्रेमी युगूलाला शिक्षा देण्याचा प्रताप केला आहे. 

गावातील अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचं एकमेकांवर प्रेम आहे, ते सोबत घर सोडून निघून गेले होते, मात्र त्यांना पुन्हा शोधून काढण्यात आलं, आणि त्यानंतर त्यांना कानपकडून उठबस करण्याची शिक्षा देण्यात आली.

एवढंच नाही तर मुलीच्या पाठिवर मुलाला बसवण्यात आलं आणि त्यांची वरात काढण्यात आली, मुलाला मुलीच्या डोक्यात शेण भरायला लावलं, एवढंच नाही तर भेट म्हणून काटेही देण्यात आले.

मुलाच्या आई-वडिलांना पाच हजार, तर मुलीच्या आई-वडिलांना १० हजार रूपये दंड करण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.