नवी दिल्ली: मोबाईल वॉलेटची वाढती पद्धत पाहता भारतातील सर्वात मोठी पब्लिक बँक भारतीय स्टेट बँकनं आज आपला मोबाईल वॉलेट अॅप एसबीआय बडी लॉन्च केलाय. मोबाईल वॉलेटच्या जगात पेटीएम सर्वात मोठं नाव आहे आणि आता या क्षेत्रात SBIनं पाऊल ठेवलंय.
एसबीआयच्या खातेधारकांची संख्या देशात सर्वाधिक आहे अशात हे अॅप SBIच्या ग्राहकांसाठी खूप उपयुक्त ठरेल.
भारतीय स्टेट बँक मोबाईल वॉलेट लॉन्च करणारी पहिली बँक नाहीय. यापूर्वी HDFC पेजॅप आणि ICICI पॉकेट नावानं आपलं मोबाईल वॉलेट लॉन्च केलेला आहे. मात्र एसबीआयचं हे मोबाईल वॉलेट फक्त SBI ग्राहकांसाठी नाही तर इतर सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल. सोबत एसबीआयनं या वॉलेटसाठी काही मर्चेन्ट्स सोबत बोलणं केलंय. ज्याद्वारे या वॉलेटनं आपण सरळ मर्चेंट पोर्टलवर जावू शकाल.
स्टेट बँकनं सध्या हे वॉलेट फक्त अँड्रॉईड यूजर्ससाठी लॉन्च केलंय. ओएसबद्दल अद्याप काही माहिती नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.