आता, बॉलिवूडमध्येही दिसणार महिला मेकअप आर्टिस्ट

आता, बॉलिवूड इंडस्ट्रीत महिला मेकअप कलाकार आणि हेअरड्रेसर्सही दिसणार आहेत. कारण, सुप्रीम कोर्टानं सोमवारी, महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करणारं या इंडस्ट्रीतल्या संघटनांचं ‘ते’ नियमच रद्दबादल ठरवले आहेत. 

Updated: Nov 11, 2014, 11:06 AM IST
आता, बॉलिवूडमध्येही दिसणार महिला मेकअप आर्टिस्ट title=

नवी दिल्ली : आता, बॉलिवूड इंडस्ट्रीत महिला मेकअप कलाकार आणि हेअरड्रेसर्सही दिसणार आहेत. कारण, सुप्रीम कोर्टानं सोमवारी, महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करणारं या इंडस्ट्रीतल्या संघटनांचं ‘ते’ नियमच रद्दबादल ठरवले आहेत. 

मेकअप आर्टिस्ट आणि हेअरड्रेसर्सच्या व्यावसायिक संघटनांनांमध्ये आत्तापर्यंत महिलांना सदस्य बनवण्यास बंदी घालण्यात आली होती. या संघटनांच्या नियमांनुसार, महिला फिल्म उद्योगात मेकअप कलाकार आणि हेअरड्रेसर्स बनू शकत नव्हत्या. 

याविरुद्ध, महिला मेकअप आर्टिस्ट चारू खुराना यांनी एका याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी हे दोन्ही नियम महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करणारे असून ते रद्द ठरवण्याची मागणी केली होती. 

न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्य अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं मेकअप आर्टिस्ट आणि हेअरड्रेसर्सच्या संघटनेचे हे नियम रद्दबादल ठरवलेत. सोबतच, या संघटनेचं सदस्य व्हायचं असेल तर पाच वर्ष किंवा त्याहून अधिक काळ एकाच जागेचे निवासी असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागत होतं, हाही नियम न्यायालयानं धुडकावून लावलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.