नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी टर्किच्या कार्गो विमानातून किरणोत्सरी पदार्थाचा उत्सर्ग झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट उडाली.
विमानतळावर उपस्थित असलेल्या प्रवाशांच्या डोळ्यांतून अचानक पाणी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
तुर्कस्तानहून आलेल्या एका विमानातून हा किरणोत्सारी पदार्थ आणला गेला. दरम्यान, फोर्टिस रुग्णालयाच्या मागणीनुसार आणला होता, असा खुलासा रुग्णालयाने केलाय. त्यामुळे वादावर पडदा पडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.