नवी दिल्ली : दिल्लीतील एका प्रतिष्ठित शाळेतील मुलीला मागील एक आठवड्यापासून अनोळखी व्यक्ती ब्लॅकमेल करत आहे. हा व्यक्ती मुलीला फोन करून भेटण्यास बोलवत आहे. जेव्हा मुलगी नाही म्हणाली तर तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली.
पीडित मुलगी जेव्हा या संदर्भात पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेली असता. आरोपीने फोटोशॉपव्दारे मुलीचे अश्लील फोटो बनवून व्हाट्सअॅपवर पाठवले. यामुळे मुलगी पोलिसांच्या समोरच रडायला लागली. सायबर सेलचे अधिकारी फिरोज यांनी तिची समजूत काढून तक्रार लिहून घेतली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मुलीच्या सांगण्यानुसार आरोपीने तिचे फेसबुक आयडी हॅक करून तिला एकटीला भेटायला बोलवतो आहे. जेव्हा भेटण्यास विरोध केला तेव्हा तुझ्या बॉयफ्रेंड सोबतचा फोटो माझ्याकडे आहे. सहारागंजला आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेली त्यावेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याव्दारे तुमचे फोटो घेतले आहेत. तू भेटायला नाही आली तर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवेल अशी धमकी दिली.
पोलिसांचे या विषयी असे म्हणणे आहे की मुलीच्या कुटुंबातील लोकांना या घटनेची पूर्ण माहिती दिल्यानंतरच आरोपीचा फोन नंबरव्दारे शोध लावण्यात येईल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.