वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामींचं निधन

वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामीचं दिल्लीमध्ये निधन झालंय. आज दुपारी अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी त्यानी प्राण सोडला. 

Updated: May 23, 2017, 08:26 PM IST
वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामींचं निधन title=

नवी दिल्ली : वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामीचं दिल्लीमध्ये निधन झालंय. आज दुपारी अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी त्यानी प्राण सोडला. राजधानीमध्ये एकेकाळी मोठं राजकीय वजन असलेल्या चंद्रास्वामीचं नाव दोन दिवंगत पंतप्रधानांसोबत जोडलं गेलं, ते संपूर्ण वेगळ्या संदर्भात.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचा चंद्रास्वामी निवटवर्ती आणि सल्लागार राहिले तर राजीव गांधी हत्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या जैन आयोगाच्या अहवालात त्याच्याकडेही अंगुलीनिर्देश करण्यात आला.

नेमी चंद असं मूळ नाव असलेल्या चंद्रास्वामीवर आर्थिक घोटाळ्यांचेही अनेक आरोप झालेत. १९९६ साली लंडनमधल्या एका उद्योजकाची फसवणूक केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती.