`सीएएम` देणार ‘सेट टॉप बॉक्स’पासून मुक्ती...

हाँगकाँग मुख्यालयस्थित कंपनी ‘एसएमआयटी कॉर्पोरेशन’ लवकरच ‘पे चॅनल’ पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सशिवाय वापरता येईल अशी सुविधा घेऊन येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 20, 2013, 12:01 PM IST

www.24taas.com, चेन्नई
हाँगकाँग मुख्यालयस्थित कंपनी ‘एसएमआयटी कॉर्पोरेशन’ लवकरच ‘पे चॅनल’ पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सशिवाय वापरता येईल अशी सुविधा घेऊन येणार आहे. यासाठी ‘एसएमआयटी कॉर्पोरेशन’नं डायरेक्ट टू होम (डीटीएच) कंपनी आणि अन्य एका कंपनीबरोबर हातमिळवणीही केलीय.
‘एसएमआयटी कॉर्पोरेशन’चे भारतातील राष्ट्रीय प्रबंधक हिमांशू शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली. ‘आम्ही जूनपर्यंत मार्केटमध्ये दाखल होण्याची आशी आहे. ‘कंडीशनल एक्सेस मॉड्युलट’च्या (सीएएम) साहाय्यानं इंटिग्रेटेड डिजिटल टेलीव्हिजन (आयडीटीव्ही) वापरणारे ग्राहक सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्ही पाहू शकतील’ असं त्यांनी म्हटलंय.
शर्मा यांनी यावेळी हातमिळवणी केलेल्या कंपन्यांची नावं मात्र गुलदस्त्यातच ठेवली आहेत. ‘एसएमआयटी’ची ही सुविधा म्हणजे एका मोठ्या सिम कार्डाप्रमाणे असेल. आयडीटीव्हीच्या मागच्या बाजूला हे कार्ड दाखल करावं लागेल. आणि तुम्हाला कोणत्याही केबल ऑपरेटर किंवा डीटीएचशिवाय चॅनल पाहता येतील.

म्हणजे, एका वेगळ्या सेट टॉप बॉक्सला आणि त्याच्या रिमोटला सुट्टी... त्यामुळे वीजही कमी प्रमाणात वापरली जाईल. आणि ‘सीएएम’चं समाधान सेट टॉप बॉक्सपेक्षा स्वस्तही असेल.