ब्रिटिश पंतप्रधानांच्या भेटीला `लगान`चा `भुवन`!

ब्रिटीश सरकार आणि ‘लगान’मधल्या भुवनचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वांनाच परिचित आहे. मात्र ब्रिटीशच्या पंतप्रधानांनी भुवनला अर्थात आमीर खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आमीरही लगेचच डेव्हिड कॅमरून यांना तातडीनं भेटायला गेला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2013, 06:48 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
ब्रिटीश सरकार आणि ‘लगान’मधल्या भुवनचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वांनाच परिचित आहे. मात्र ब्रिटीशच्या पंतप्रधानांनी भुवनला अर्थात आमीर खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आमीरही लगेचच डेव्हिड कॅमरून यांना तातडीनं भेटायला गेला. या दोघांनी दिल्लीच्या जानकीदेवी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला.
यावेळी कॅमरून यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या ब्रिटनमधील शिक्षणासंदर्भात आमीरशी खास चर्चा केली. जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ब्रिटनला पसंती द्यावी यासाठी ब्रिटन सरकार प्रयत्नशील राहील असा संदेश डेव्हीड यांनी भेटीतून दिला.

तर दुसरीकडे कॅमरून यांनी मुंबईच्या ओव्हल मैदानावर क्रिकेटचा आनंद लुटला. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी मुंबईच्या ओव्हल मैदानावर स्थानिक मुलांबरोबर एक फ्रेंडली क्रिकेटची मॅच खेळली. आणि या मॅचमध्ये त्यांनी दोन शानदार कव्हर ड्राईव्हसही लगावले. एक स्पिनबॉलवर कॅमरून बोल्ड झाले असले तरी क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंडच्या पंतप्रधानांनी चांगलीच बॅटिंग केली. आणि त्यांची ही बॅटिंगही मुंबईकरांनी चांगलीच एन्जॉय केली.