मुंबई : आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत असे त्यांनी शनिवारी जाहीर केलेय. आता आरबीआयच्या प्रमुखपदी कोण येणार याचा शोध सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सरकारकडे सात नावांची यादी आहे.
सात नावांची यादी
आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी आरबीआयचे उपगव्हर्नर उर्जित पटेल, विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला या सात नावांची चर्चा आहे.
या चर्चेमध्ये अर्थखात्यातील अधिकारी शक्तीकांत दास आणि अरविंद सुब्रमण्यम यांच्या नावाची देखील चर्चा होती.
रघुराम राजन यांचा कार्यकाळ येत्या ४ सप्टेंबरला संपणार असून ते अध्यापनाकडे वळणार असल्याचे त्यांनी जाहीर केल आहे.