पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात पवारांनी फेसबुकवर माहिती दिलीय. लांबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

Updated: Jul 1, 2014, 01:15 PM IST
पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट title=
सौजन्य, फेसबुक

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात पवारांनी फेसबुकवर माहिती दिलीय. लांबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

पिण्याच्या पाण्यासंदर्भातील माझी चिंता यावेळी आपण व्यक्त केली. त्यावर पंतप्रधानांनी हवामान खात्याचा हवाला देऊन दिलासा देणारी अशी माहिती दिलीय. ५ जुलैच्या सुमारास पाऊस सुरू होईल, असा अंदाज आहे. मात्र त्यानंतरही पावसाला विलंब झाल्यास योग्य ती पावलं उचलण्यात येतील, याची हमी पंतप्रधानांनी यावेळी दिल्याचं पवारांनी फेसबुकवर म्हटलंय.

राज्यावर असलेलं दुष्काळाचं सावट आणि लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींची भेट घेतली. पावसाची प्रतीक्षा लांबल्यानं खरीपाच्या हंगामावर मोठा परिणाम झालाय. तसंच भविष्यात याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता असल्यानं पवारांनी मोदींशी यासंदर्भात चर्चा केल्याचं सांगण्यात आलंय. 

 ५ जुलैच्या सुमारास पाऊस सुरू होईल, असा अंदाज आहे. मात्र त्यानंतरही पावसाला विलंब झाल्यास योग्य ती पावलं उचलण्यात येतील, याची हमी पंतप्रधानांनी दिली आहे, अशी माहिती पवार यांनी दिलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.