नवी दिल्ली : संरक्षण आणि नागरी हवाई वाहतूक या दोन क्षेत्रातील १०० टक्के परदेशी गुंतवणुकीस परवानगी देणे ही चिंतेची बाब आहे, अशी प्रतिकिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात बलाढ्य परदेशी कंपनी आल्यास, ती हवाई वाहतुकीवर कब्जा मिळवेल. त्यामुळे भारतीय हवाई कंपन्यांची अवस्था किंगफिशर सारखी होईल. तसेच, त्यानंतर प्रवासाचे दर वाढवलयास प्रवाशांना देखील त्याचा फटका बसेल. असे पवार यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्या विषयावरून शरद पवार यांनी भाजप सरकारला लक्ष केलं आहे. आरबीआयचा गव्हर्नर हा देशात कधी चर्चेचा विषय झाला नाही. त्यास भाजप जबाबदार आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे.