मला फटकारण्याची कोणात हिंमत नाही, शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर हल्लाबोल

Updated: Nov 18, 2015, 01:20 PM IST
मला फटकारण्याची कोणात हिंमत नाही, शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर हल्लाबोल title=

पाटणा - भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ट्विटरद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. बिहारमधील पराभवानंतरही या लोकांना यातून धडा घ्यायचा नाहीये. तसेच आपल्याला फटकारण्याची कोणामध्येही हिम्मत नाहीये अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय. 

"बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही या लोकांना त्यातून बोध घेता येत नाहीये. चुकीच्या सूचना देऊन ते लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. कोणामध्ये हिम्मत नाही आम्हाला फटकारण्याची," असं त्यांनी ट्विटवर म्हटलंय.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचा धक्का बसला. बिहारी जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमाराच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x