गाजियाबाद : गाजियाबादमधील छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहे. शनिवारी दुपारी अशीच घटना नासिरपूर फाटकाजवळ घडली. एका कार चालकानं तिथल्याच ट्रांसपोर्टरच्या पत्नीची छेड काढली.
त्या महिलेनं त्या इसमाला बघून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या माणसानं जवळ जवळ त्या बाईचा ५०० मीटरपर्यंत पाठलाग केला. शेवटी त्या बाईनं वैतागून तिच्या नवऱ्याला फोन केला, तर त्या वेळेस त्यानं तिला कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला.
यावर मात्र त्या बाईनं तिच्या पायातली चप्पल काढली आणि आरडाओरडा करत त्याला चांगलाच चपलीनं चोपला.
शनिवारी दुपारी जेव्हा ती महिला तिच्या मुलांना शाळेतून आणायला जात होती तेव्हा ही घटना घडली. मुलांना घेऊन येताना तिनं बघितलं की तो कार चालक शाळेच्या बाहेरच उभा होता. त्यावेळेस न राहवून मात्र त्या महिलेनं त्याला चपलेचा मार दिला आणि त्याची चांगलीच धुलाई केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.