पीएमनं बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक, ममता, ओमर अनुपस्थित

नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संघटन तयार करताना त्याची रचना कशी असावी, त्या नव्या पद्धतीतून काय निर्माण होऊ शकेल, त्याची भूमिका नेमकी कशी असावी अशा विविध प्रश्नां चा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत सुरू झालीय आहे. 

Updated: Dec 7, 2014, 01:26 PM IST
पीएमनं बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक, ममता, ओमर अनुपस्थित title=

नवी दिल्ली: नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संघटन तयार करताना त्याची रचना कशी असावी, त्या नव्या पद्धतीतून काय निर्माण होऊ शकेल, त्याची भूमिका नेमकी कशी असावी अशा विविध प्रश्नां चा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत सुरू झालीय आहे. 

या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न पंतप्रधान करणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. मात्र या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला गैरहजर आहेत. 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या पार्श्व्भूमीवर बोलताना सांगितलं की, राज्यांना अधिकार देणं हा एक गुंतागुंतीचा विषय असून त्यावर आमचा विश्वाासही आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीमधून जो काही निर्णय घेतला जाईल त्यामुळं राज्य सरकारांची स्थिती अधिक चांगली होऊ शकेल. 

नियोजन सचिव सिंधुश्री खुल्लर हे या कार्यक्रमामध्ये विविध कामांचं आणि नव्या पद्धतीसंबंधातील मुद्द्यांचं सादरीकरण करणार आहेत. त्यातून तयार होणारं संघटन वा नवी संस्था ही नियोजन आयोगाला पर्याय असणार आहे. 

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला दृष्टिकोन सादर करावा असं अपेक्षित आहे. अधिकार्यांाशी, नियोजन आयोगाच्या माजी सदस्यांशी चर्चा करून या नव्या संस्थात्मक पर्यायाच्या संकल्पना आराखड्याची रचना करण्यात आली आहे. नियोजन आयोगाच्या पर्यायामध्ये साधारण ८ ते १० नियमित आणि कार्यकारी सदस्य असतील. त्यात ५० टक्के सदस्य हे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे असतील. 

प्रकल्प, नियोजन आदींबाबतचे मूल्यमापन आणि नियंत्रण आदी विविध कामांसह या नव्या संस्थेद्वारे केल्या जाणार आहेत. २ मे १४ पासून नियोजन आयोगाची पुनर्रचना झालेली नाही. नवं सरकार आल्यानंतर पूर्वीच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.