शिया पर्सनल लॉ बोर्डाकडून ट्रिपल तलाक बंदीचं समर्थन

ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने ट्रिपल तलाक बंदीचे समर्थन केलंय. इतकंच नाहीतर ट्रिपल तलाकविरोधातला कायदा करण्याची मागणीही शिया पर्सनल लॉ बोर्डाने केलीय.

Updated: Apr 6, 2017, 07:36 PM IST
शिया पर्सनल लॉ बोर्डाकडून ट्रिपल तलाक बंदीचं समर्थन  title=

लखनऊ : ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने ट्रिपल तलाक बंदीचे समर्थन केलंय. इतकंच नाहीतर ट्रिपल तलाकविरोधातला कायदा करण्याची मागणीही शिया पर्सनल लॉ बोर्डाने केलीय.

लखनऊमध्ये बुधवारी ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत ट्रिपल तलाकबाबत महिलांच्या अधिकारासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची शिफारस करण्यात आलीय. 

ट्रिपल तलाक बंदीमुळे हजारो महिलांचं आयुष्य उद्धवस्त होण्यापासून वाचेल. त्यामुळे ही प्रथा संपुष्टात आणण्यासाठी देशात कायदा बनवण्याची मागणीही ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने केलीय. तसंच गोवंश हत्याबंदीचंही बोर्डाने या बैठकीत समर्थन केलंय.