मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार आहे, शिवसेनेचे खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण पंतप्रधानांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर शिवसेना खासदारांचा बहिष्कार असणार असल्याचं सांगण्यात येतंय.
दुसरीकडे शिवसेना खासदार अनिल देसाई दिल्लीला रवाना झाले आहेत, अनिल देसाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं सांगण्यात येतंय. तर शिवसेना भाजपची दिल्लीतच चर्चा होऊन दिल्लीतच शेवटचा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.
शिवसेनेला राज्यात महत्वाची पद मिळावीत अशी मागणी शिवसेनेची आहे, मात्र भाजपने याबाबतीत शिवसेनेला जरा लांबच ठेवलं आहे, तरी देखिल शिवसेनेने केंद्रात शपथ घेऊन राज्यात सहभागाविषयी संकेत दिले आहेत.
शिवसेनेच्या खासदारांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली तर, राज्यात शिवसेनेला सहभागी करून घेण्यास भाजपला सोपे होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.