शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना दणका, विमान प्रवासावर बंदी

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे.

Updated: Mar 24, 2017, 11:06 AM IST
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना दणका, विमान प्रवासावर बंदी  title=

नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सनं हा निर्णय जाहीर केलाय, त्यामुळे आता जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट आणि गोएअर या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करता येणार नाही.

रवींद्र गायकवाड यांनी काल एअर इंडियाच्या एका अधिका-याला मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. एअर इंडियाच्या कर्माचा-याला मारहणा केल्याप्रकरणी गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

एअर इंडियाच्या कर्मचा-यांनी खासदारांना दुय्यम वागणूक दिली असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. बिजनेस क्लासचे तिकीट असूनही इकॉनामी क्लासमध्ये हलवल्यामुळे संतापलेल्या रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिका-याला चपलेने मारहाण केली होती. ते पुण्यावरून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने निघाले होते.