पणजी : महाराष्ट्रात भाजपाबरोबर युती असलेली शिवसेना गोव्यात भाजपच्या विरोधात रणनीती आखण्याच्या तयारीला लागली आहे.
संपूर्ण कार्यकारणीत मोठे बदल करत गोव्याची सूत्रे आंदोलनकर्ते अॅडवोकेट अजितसिंग राणे यांच्याकडे देण्यात आली आहेत. तशी घोषणा शिवसेनेचे गोवा संपर्क प्रमुख प्रदीप बोरकर यांनी केलीय याशिवाय सुदेश भिसे यांच्याकडे उपराज्यप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलीय.
याशिवाय आनंद शिरगावकर ,फिलीफ डिसौझा ,राजू विर्डीकार, मंदार पार्सेकर यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत . यापुढील काळात शिवसेना गोवेकरांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही पदाधिकार्यांनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.