मोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!

मोदी सरकारविरोधात 'जनता परिवार'मध्ये बुधवारी सहा पक्ष एकत्र आलेत. या नव्या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत मुलायम सिंह यादव... 

Updated: Apr 15, 2015, 07:43 PM IST
मोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!  title=

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात 'जनता परिवार'मध्ये बुधवारी सहा पक्ष एकत्र आलेत. या नव्या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत मुलायम सिंह यादव... 

या नव्या पक्षाचं नाव, निवडणूक चिन्ह आणि झेंड्यावर अजूनही निर्णय होणं बाकी आहे. जनता परिवारातील सहा पक्षांमध्ये नीतीश कुमार यांचा जनता दल (यूनायटेड), लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (जेडीयू), मुलायम सिंह यादव यांची समाजवादी पार्टी (एसपी), ओम प्रकाश चौटाला यांचा इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी), जनता दल (सेक्युलर) आणि समाजवादी जनता पार्टी (एसजेपी) या पक्षांचा समावेश आहे.

मुलायम सिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली नव्या पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध रणशिंग फुंकलंय असं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. सांप्रदायिक पक्षांकडून देशाला धोका असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 

देशातील सांप्रदायिक शक्तींशी दोन हात करण्यासाठी देशातील समाजवादी एकत्र आले आलेत. आम्ही सगळेच मिळून मोदींचा सफाया करून टाकू.... आमच्या-आमच्यांतील मतभेद आता दूर झालेत, असंही लालू यावेळी म्हणतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.