पीओकेमध्ये पुन्हा लागले पाकिस्तानकडून आजादीचे नारे

 पाकिस्तानातील काश्मीर (पीओके) येथील मुजफ्पराबादमध्ये आज पुन्हा आजादीचे नारे लावून विरोध प्रदर्शन केला. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे अनेकांनी रस्त्यावर येऊन हंगामा केला. तसेच पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. 

Updated: Aug 12, 2016, 09:28 PM IST
पीओकेमध्ये पुन्हा लागले पाकिस्तानकडून आजादीचे नारे title=

मुजफ्पराबाद :  पाकिस्तानातील काश्मीर (पीओके) येथील मुजफ्पराबादमध्ये आज पुन्हा आजादीचे नारे लावून विरोध प्रदर्शन केला. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे अनेकांनी रस्त्यावर येऊन हंगामा केला. तसेच पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. 

येथील नागरिकांचा असंतोष निवडणुकांत झालेल्या हेराफेरीमुळे झाला आहे. लोकांनी आरोप केला की निवडणुकांत गडबड झाली आहे. नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीग पक्षाने ४१ पैकी ३२ जागांवर विजय मिळविला. या निकालानंतर हा राग आला आणि ते रस्त्यावर उतरले. 

पाहा व्हिडिओ... कशा लागल्या घोषणा