स्नूपगेट प्रकरणी अमित शहांना दिलासा

मूळ बंगळूरची रहिवासी असणाऱ्या गुजरातमधील आर्किटेक्‍ट तरुणीवर पाळत ठेवल्याप्रकरणी तपास करण्यासाठी न्यायमूर्ती सुग्नय भट्ट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाची स्थापना करणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहे. एकंदरीत स्नूपगेटच्या आरोपातून अमित शहा यांना दिलासा मिळाला आहे.

Updated: Oct 10, 2014, 11:21 PM IST
स्नूपगेट प्रकरणी अमित शहांना दिलासा title=

अहमदाबाद : मूळ बंगळूरची रहिवासी असणाऱ्या गुजरातमधील आर्किटेक्‍ट तरुणीवर पाळत ठेवल्याप्रकरणी तपास करण्यासाठी न्यायमूर्ती सुग्नय भट्ट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाची स्थापना करणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहे. एकंदरीत स्नूपगेटच्या आरोपातून अमित शहा यांना दिलासा मिळाला आहे.

 न्या. परेश उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज तरुणीच्या वडिलांच्या याचिकेला मान्यता देत हे आदेश दिले. 

काँग्रेसच्या आरोपांचं काय होणार?
आपल्या साहेबांसाठी तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच या तरुणीवर पाळत ठेवण्यात आली होती, असा आरोप विरोधकांनी केला होता. अमित शहांचे "साहेब‘ हे दुसरे-तिसरे कोणी नसून नरेंद्र मोदीच असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.