www.24taas.com , वृत्तसंस्था, उन्नाव
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील एका किल्ल्यात सोन्याचा खजाना दडलाय हे स्वप्न पाहणाऱ्या शोभन सरकारचा शिष्य ओम बाबा काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत.
काँग्रेसचे माजी आमदाय जय नारायण यांनी दावा केला आहे की, ओम बाबा जुने काँग्रेसवाले आहेत. त्यांनी जिल्हा काँग्रेसचे महासचिवपद भूषविले आहे. शोभन सरकारचे शिष्य ओम बाबा हे शोभन यांनी पाहिलेल्या खजान्याच्या स्वप्नानंतर चर्चेत आले आहेत.
शोभन सरकारचे शिष्य ओम महाराजने तसे कबुल केल आहे. कधी काळी आपण काँग्रेसमध्ये होतो. त्याच्या जुन्या साथीदारांनेही तसा दावा केला आहे. या दाव्यानंतर राजयकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वप्नातील खजानामागे काही राजकीय खेळी आहे का, याची चर्चा होण्याची शक्यता आहे.
ओम बाबाचे जुने सहकारी सांगतात, ते कधी काळी काँग्रेसमध्ये होते. १९८४मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राजयकी सैन्यास घेतला. त्यांना ओळखणाऱ्यांनी सांगितले की, त्याचे खरे नाव ओम अवस्थी आहे. ते इंदिरा गांधी असताना ते काँग्रेसमध्ये होते.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोभन सरकारबाबत चिठ्ठी लिहिल्यानंतर राजकीय वाद वाढला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.