सुनंदा पुष्करचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव- डॉ. सुधीर गुप्ता

माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)चे फॉरेंसिक विभागाचे हेड सुधीर गुप्ता यांनी आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार केलीय की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला सामान्य दाखविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. गुप्ता यांनी केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्यूनल (सीएटी)कडेही याबाबत तक्रार केलीय.

Updated: Jul 2, 2014, 08:57 AM IST
सुनंदा पुष्करचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव- डॉ. सुधीर गुप्ता title=

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)चे फॉरेंसिक विभागाचे हेड सुधीर गुप्ता यांनी आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार केलीय की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला सामान्य दाखविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. गुप्ता यांनी केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्यूनल (सीएटी)कडेही याबाबत तक्रार केलीय.

एका वेबसाईटनं दिलेल्या रिपोर्टनुसार गुप्ता यांनी दावा केलाय की, दोन माजी केंद्रीय मंत्र्यांनी थरूर आणि आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या दबावामुळे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये खरी बाब जाहीर करू शकलो नाही.

सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह 14 जानेवारी 2014ला चाणक्यपुरी इथल्या हॉटेल लीला पॅलेसच्या रूम नंबर 345मध्ये सापडला. पाकिस्तानची महिला पत्रकार मेहर तरारचे शशि थरूर यांच्यासोबत संबंधांवरून सुनंदा-शशि थरूर यांच्यात तणाव होता. त्यांच्यात ट्विटरवरील वादही पुढं आला होता. शशि थरूर आणि सुनंदा पुष्कर यांचा तिसरा विवाह होता. सुनंदा यांचा 21 वर्षीय शिव मेनन हा मुलगाही आहे. सुनंदा पुष्कर यांचं हे दुसरं लग्न होतं.

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असलेल्या जोडप्यात थरूर यांच्या संबंधांवरून चांगलाच वाद झाला होता. या प्रकरणाची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा त्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर मेहर तरारनं पुष्कर यांचे आरोप खोटे असून थरूर यांच्याशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.