www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पती शशी थरुर यांचे एका पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं जाहीर करणाऱ्या सुनंदा पुष्कर यांचा आज गूढरित्या मृत्यू झालाय.
दिल्लीतील लीला हॉटेलमधल्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला आहे. केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या त्या पत्नी होत्या. थरुर यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोन दिवसांपासून सुनंदा नाराज होत्या. हाती लागलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनंदा पुष्कर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सुनंदा यांनी लीला हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. शशी थरुर यांना हॉटेल स्टाफकडून सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूची बातमी समजली. यानंतर थरुर यांनी पोलिसांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी दिली.
LIVE : घडामोडी
रात्री ११.४० वा. नोकर आणि ड्रायव्हरकडे विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी शशी थरुर यांच्याकडेही सुरु केली चौकशी
रात्री ११.३० वा. सुनंदा पुष्कर यांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात...
रात्री ११.१० वा. शशी थरुर यांच्या नोकर आणि ड्रायव्हरकडे पोलिसांची चौकशी
रात्री ११.०५ वा. हॉटेलमध्ये तिसऱ्या मजल्यावरील ३४५ आमि ३४२ हे दोन रुम बुक करण्यात आले होते, पोलिसांची माहिती
रात्री ११.०० वा. फॉरेन्सिक एक्सपर्टला पाचारण करण्यात आलंय
रात्री १०. ४५ वा. घरात पेंटिंगचं काम सुरू होतं. त्यामुळे शशी आणि सुनंदा यांनी हॉटेलमध्ये सूट बुक केला होता... शशि थरुर यांच्या रुममध्ये जाण्यापूर्वी कुणीही रुममध्ये गेलं नव्हतं.... त्यांना वाटलं सुनंदा झोपलेल्या आहेत... त्यांनी हॉटेल स्टाफला विचारलं की 'मॅडम कधीपासून झोपलेल्या आहेत' - अभिनव कुमार, शशी थरुर यांचे पर्सनल सेक्रेटरी
रात्री १०. ३० वा. पोलिसांनी हॉटेलमधलं सीसीटीव्ही फूटेज घेतलं ताब्यात
रात्री १०.३५ वा. हॉटेलच्या मजल्याला पोलिसांनी सील केलं.
रात्री १०.४० वा. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूसाठी विष कारणीभूत ठरल्याचा पोलिसांना संशय
दरम्यान, सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शशी थरुर यांना चौकशीसाठी बोलावल्याचं समजतंय. सुनंदा यांनी आत्महत्या केलीय किंवा आणखी काही याबाबत पोलिसांनी अद्याप काहीही सांगता येणं कठिण असल्याचं सांगितलंय.
शशी थरुर यांनी काल म्हणजे गुरुवारी फेसबुकवर दोघांच्या वतीनं ‘सुनंदा आणि आपण आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी असून आपणं ‘आनंदी दांम्पत्य’ असल्याचं’ म्हटलं होतं. सुनंदा पुष्कर यांचा आज मृतदेह सापडल्यानंतर जर सगळं काही ठिक होतं तर त्या हॉटेलमध्ये का राहिल्या होत्या? हा प्रश्न उपस्थित होतोय.
LIVE : व्हिडिओ पाहा
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.