एक्सक्लुझिव्ह : सुनंदाच्या नावे दुबईत ९३ कोटींची संपत्ती

 सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी नवनव्या गोष्टी समोर येतायत... दुबईत सुनंदा पुष्करची तब्बल ९३ कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालंय. 'झी मीडिया' आणि 'डीएनए'नं दुबईत जाऊन याबाबत एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळवलीय.

Updated: Feb 13, 2015, 09:41 AM IST
एक्सक्लुझिव्ह : सुनंदाच्या नावे दुबईत ९३ कोटींची संपत्ती title=

नवी दिल्ली :  सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी नवनव्या गोष्टी समोर येतायत... दुबईत सुनंदा पुष्करची तब्बल ९३ कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालंय. 'झी मीडिया' आणि 'डीएनए'नं दुबईत जाऊन याबाबत एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळवलीय.

नव्वदच्या दशकात एका गेम शोच्या आयोजनात सुनंदा पुष्कर आणि तिचा पहिला पती सुजीत मेननला बावीस लाखाचा फटका बसला होता. मात्र, त्यानंतर २००४ ते २०१० या सहा वर्षांच्या काळात दुबईत परतल्यावर सुनंदा पुष्करनं ९३ कोटींची संपत्ती कशी कमावली? याचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट झी मीडिया आणि डीएनएनं तयार केलाय.

'सुनंदा आत्महत्या करूच शकत नाही'

यासाठी 'झी मीडिया'नं सुनंदाच्या दुबईतील जवळच्या मित्रांशी बातचीत केली. सुनंदा एक खंबीर व्यक्तीमत्त्व होतं. त्यामुळं ती आत्महत्या करणं शक्यच नाही, असा दावा सुनंदाच्या मित्रांनी केलाय. दिल्ली पोलीस दुबईतील सुनंदा पुष्करच्या आयपीएल कमाईचा तपशीलही तपासत आहेत. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय.

थरुर यांची सात तास चौकशी

दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सुनंदा पुष्कर यांचे पती शशी थरून यांना सुनंदाच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांच्या विशेष चौकशी समितीनं (एसआयटी) तब्बल सात चौकशी केली.  एसआयटीनं थरूर यांची रात्री उशीरा झालेल्या 'त्या' दोन तासांच्या चौकशीचाही समावेश आहे जी आयपीएल वादाशी निगडीत प्रश्न उभे राहिल्यानंतर झाली होती.  १९ जानेवारी रोजी  थरूर यांची रात्री उशीरा चौकशी करण्यात आली होती त्यानंतर थरूर यांना आपल्या वकिलासोबत बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.