सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे कान उपटले

दिल्लीत सरकार स्थापन करण्यात उशीर झाल्याच्या कारणावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. लोकशाहीत राष्ट्रपती राजवट कायम राहू शकत नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Updated: Oct 28, 2014, 03:04 PM IST
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे कान उपटले title=

नवी दिल्ली : दिल्लीत सरकार स्थापन करण्यात उशीर झाल्याच्या कारणावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. लोकशाहीत राष्ट्रपती राजवट कायम राहू शकत नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

या वर्षी फेब्रुवारीत आम आदमी पार्टीच्या सरकारने राजीनामा दिली होता, यानंतर दिल्लीत राष्ट्रपती शासन होतं.

या आधी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलं की, राष्ट्रपतींनी त्यांवा उपराज्यपाल यांना सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासं सांगितलं होतं.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या या सैल भूमिकेवर केंद्राला फटकारलं आहे, सरकार सुनावणीच्या दिवशी वेगळं आणि नंतर वेगळं स्पष्टीकरण देत असल्याचं दिसतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.